Menu

खेड : डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले, शिवसेना सोडण्याचे कारण

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ का स्वीकारले याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी छत्रपतींच्या गादीची कधीच गद्दारी करणार नाही, ही भावना मनात धरून शिवसेना सोडल्याचे सांगत यावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a1-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%b8

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हे यांच्या प्रचाराची आज सांगता झाली. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी शिवसेना का सोडली याचा खुलासा केली. त्यामुळे मोठी हलचल सुरु झाली आहे.

शिवसेनेने मला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढणार का, असा प्रश्न विचारला. त्याचवेळी मी त्याचक्षणी त्यांना उत्तर देत मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नाही, असे स्पष्ट सांगितले आणि शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली, अशी जाहीर माहिती अमोल कोल्हे दिली. यावेळी अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.

अमोल कोल्हे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सेनेला का जय महाराष्ट्र केला यावर भाष्य केले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारच्या अखेरच्या दिवशी भाष्य केले. तसेच सोशल मीडियावर सतत व्हायरल होणाऱ्या फोटोबाबतही कोल्हे म्हणाले, अभिनेता कशाला हवा, अशी विचारणा होते. पण सातार्‍यातून निवडणूक लढवणार का, हे शिवसेनेकडून विचारण्यात आले होते. उदयनराजेंच्या विरूध्द निवडणूक लढविण्यास सांगितल्यानेच आपण शिवसेना सोडली.

अमोल कोल्हे यांना निवडून दिले तर दोन-दोन काम होणार. एकतर तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आला तर ते पण सुटणार आणि काही दुखत असले की लगेच इंजेक्शन म्हणजेच इलाज. त्यांना लगेच आठवण करून द्यायचे घड्याळ्याचे बटन दाबले होते, असे अजित पावर म्हणाले.

^