Menu

दिवसाढवळ्या अभिनेत्रीची लाखोंची बॅग चोरीला

काही सेलिब्रिटी हे त्यांच्या राहणीमानासाठी कायमच ओळखले जातात. मुळात सेलिब्रिटींचा पेहराव, त्यांचं राहणीमान या साऱ्यामध्ये एकंदरच श्रीमंती झळकत असल्याचं पाहायला मिळतं. जगप्रसिद्ध ब्रँड, महागड्या वस्तु वापरण्याकडे बऱ्याच सेलिबरिटींचा कल असतो. हॉलिवूड अभिनेत्री jenna dewan जेना दीवानही त्यांच्यापैकीच एक. पण, सध्या मात्र तिला एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला आहे.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80

दिवसाढवळ्या झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात जेनाची मौल्यवान गोष्ट चोरीला गेली आहे. चोरट्यांनी तिच्या कारची तोडफोड करुन जवळपास तीन हजार डॉलर्स म्हणजेच २.५ लाख किमतीची तिची यवेस सेंट लॉरेंट बॅग पळवली आहे. ‘टीएमझेड’च्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली जेव्हा जेनाची कार लॉस एंजेलिस येथील सनसेट स्ट्रीटवर पार्क केली होती. याविषयीची माहिती मिळताच काऊंटी शेरीफ भागातील स्थानिक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी जेनाचा प्रियकर स्टीव्हसुद्धा तेथे आला होता.

^