Menu

पालघर जिल्ह्यातील पिकांवर लष्करीअळीचा प्रभाव 

पालघर जिल्ह्य़ातील डहाणू तालुक्यातील पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रार्दुभाव झाल्याने सावधगिरीचा इशारा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ही अळी इतर पिकांनाही लागण्याची शक्यता ठाणे  वर्तविण्यात येत आहे. अळीमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्रासह कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. याशिवाय नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधीक्षक के. बी. तरकसे यांनी केले आहे. डहाणू तालुक्यात ही लष्करी अळ सापडल्यामुळे तिची लागण इतर पात असणाऱ्या पिकांना लागण्याची शक्यता आहे. एकटय़ा डहाणू तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप भात लागवड, तर सुमारे पाच हजार हेक्टरवर चिकू फळबागा आहेत. जर या अळींचा भात पिकावर प्रादुर्भाव झाला तर शेतकऱ्यांचे हातचे पीक जाऊन नुकसानीचा आकडा मोठा असेल आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. याआधीच शेतकरी अतिवृष्टी, बदलते हवामान यामुळे पिकांवर होणाऱ्या परिणामांमुळे हतबल आहे. त्यात या नवीन रोगाचा प्रादुर्भाव समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
24501

^