Menu

पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारत घेतोय ‘अफगाणिस्तान’ देशातून कांदा

कांद्याचा वाढता दर सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. परंतु आता अफगाणिस्तानमधील काबुलने भारताशी मैत्री निभावत, देशात कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या पश्चिम सीमेलगत असलेल्या पंजाबच्या विविध शहरांत गेल्या काही दिवसांपासून अफगाणी कांदा विकण्यास सुरुवात झाली आहे. व्यापारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानहून पाकिस्तानमार्गे देशात कांदा आयात होत असल्याचे सांगितले.
%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%9a

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानहून लवकरच ३० ते ३५ गाड्या कांदा देशात येणार आहे. भारतात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अफगाणिस्तान व्यापारी येथील बाजारात कांदा विक्रीसाठी उत्साहीत असल्याचे सांगितले. अमृतसर आणि लुधियानामध्ये अफगाणी कांदा ३० ते ३५ रुपये प्रति किलो विकला जात असल्याची माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.  भारतात पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानहून कांदा येण्याबाबत विचारले असता, कस्टम विभागातील एका अधिकाऱ्याने अफगाणिस्तानहून माल येण्यास कोणतीही बंदी नसल्याचे सांगितले.

^