Menu

कपिल देव यांचा सल्लागार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

कपिल देव यांनी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कपिल देव या समितीचा राजीनामा देणारे दुसरे सदस्य आहेत. याआधी शांता रंगस्वामी यांनीही त्यांचं पद सोडलं होतं. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांना नोटीस पाठवली होती. या समितीमध्ये अंशुमन गायकवाड हे तिसरे सदस्य आहेत.
%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8

कपिल देव यांनी पदाचा राजीनामा द्यायचं कारण सांगितलेलं नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकीय समितीला राजीनाम्याचा ई-मेल पाठवला आहे. ‘खरं तर प्रशासकीय समितीनेच कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालची क्रिकेट सल्लागार समिती बरखास्त करण्यात आल्याचं सांगितलं पाहिजे होतं. कारण प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी फक्त प्रशिक्षकाच्या निवडीसाठीच क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं’, असं सूत्राने सांगितलं.

^