Menu

मुंबई : पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ‘त्या’ ४९ कलाकारांविरोधात एफआयआर दाखल

मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणांविरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता या सर्व कलाकारांपुढे एक मोठी अडचण उभी राहिली आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d

देशात मॉब लिंचिंगच्या घडामोडींमुळे बिघडत असणाऱ्या वातावरणाविषयी थेट पंतप्रधानांनाच एक पत्र लिहिलं होतं. त्याच प्रकरणी आता त्या कलाकारांविरोधातील तक्रारीची नोंद अर्थात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सदर पोलीस स्थानकात ४९ चित्रपट कलाकारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच ही कारवाई करण्यात आली. वकील सुधीर ओझा यांनी गेल्या वर्षी या कलाकारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. असहिष्णुता आणि उन्मत्त हिंसा यांमुळे देशातील वातावरण बिघडत असल्याचं या कलाकारांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून सांगितलं होतं. जे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर सुधीर ओझा यांनी परदेशात आपल्या देशाला बदनाम करण्यासाठीचा हा कट असल्याचं म्हणत हा मुद्दा थेट न्यायालयात नेला होता.

^