Menu

सचिन पिळगावकर यांना विश्वासू नोकराचा गंडा, सन्मानचिन्ह विकली भंगारात

मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते,गायक आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना त्यांच्याच विश्वासू नोकराने फसवल्याची घटना समोर आली आहे. सचिन आणि त्यांचे वडिल दिवंगत शरद पिळगावकर यांना मिळालेली सन्मानचिन्ह त्यांच्या कार्यालयातून चोरीला गेल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे ही चोरी दुसऱ्या-तिसऱ्या कोणी न करता त्यांच्या विश्वासू नोकराने केल्याचे उघड झाले आहे. अमृत सोळंकी (३५) असे या नोकराचे नाव असून त्याला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे.
%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d

सचिन पिळगावकर यांचे दिवंगत वडिल शरद पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीमधील एक नावजलेले चित्रपट निर्माते होते. त्यांना अनेकदा उत्कृष्ट चित्रपट निर्माते म्हणून गौरवण्यात आले होते. सचिन यांनी त्यांची आणि त्यांच्या वडिलांची कमावलेली सन्मानचिन्हे त्यांच्या जुहू येथील कार्यालयात जतन करुन ठेवली होती. काही दिवसांपूर्वी सचिन यांनी कार्यालयाच्या डागडुजीचे काम सुरु केले होते. ते पाहण्यासाठी त्यांची पत्नी सुप्रिया तेथे पोहोचल्या होत्या. दरम्यान त्यांना तेथे सन्मानचिन्हे दिसली नाहीत. त्यांनी याबाबत त्यांचा नोकर अमृत सोळंकी याला विचारले. ज्याला उत्तर देताना सोळंकी याने कार्यालयाचे काम सुरु असताना सन्मानचिन्हे धुळीने खराब होऊ नये म्हणून गोणीत भरुन ठेवली असल्याचे सांगितले. मात्र सध्या ती कुठे गेली हे माहित नसल्याचे सोळंकीने सांगितले.

यानंतर सु्प्रिया पिळगावकर यांनी घडलेला प्रकार सचिन यांच्या कानावर घातला. सचिन यांनी त्वरीत सांताक्रूझ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. सचिन आणि सुप्रिया यांचा नोकर अमृतवर संशय असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतेले. अमृतने ही सन्मानचिन्हे केवळ ४०० ते ५०० रुपयांना विकली असल्याची कबुली दिली. वडिलांनी इतके वर्षे मेहनत घेऊन कमावलेली सन्माचिन्ह कवडीमोल पैशासाठी विकी गेल्यामुळे सचिन यांना धक्का बसला आहे.

^