Menu

दहा रुपयांची नाणी गोळा करून तरुणाने भरली निवडणूक अनामत रक्कम

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० रुपयांच्या नाण्यांचा वापर केला आहे.
%e0%a4%a6%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0

संतोष संभाजी साबदे असे या उमेदवाराचे नाव असून आणि वय अवघे २८ वर्षे आहे, साबदे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या बाजारात १० रुपयांचे नाणं कुठलेही व्यापारी तसेच बँकाही स्वीकारत नाहीत. ज्यांच्याकडे ही १० रुपयांची नाणी आहेत त्यांची मोठी अडचण होत होती. चलनात असणारे नाणं न स्वीकारण्याचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी संतोष साबदे यांनी मतदारांना आवाहन करून १० रुपयांची नाणी देण्याचे आवाहन सोशल मीडियावरून केलं. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला.

^