Menu

निर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे. यामुळे ऐन सणासुदीला कांद्याचा भाव भडकण्याची चिन्हं आहेत.
%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6

मध्यप्रदेशातून येणारा उन्हाळ कांदा संपल्यानंतर आणि आंध्रप्रदेश, कर्नाटकातील पुरामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला. लासलगाव बाजार समितीमध्ये भाव ५१०० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे आठ दिवसांत केंद्राचं पथक २ वेळा लासलगावला आलं. या पथकाच्या अहवालानंतर केंद्रानं कांद्याला निर्यातबंदी केली आणि साठ्यावर 500 क्विंटलची मर्यादा आणली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. यापुढे कांदा विक्री करणार नसल्याचं पत्र शेतकरी संघटनेनं लासलगाव बाजार समितीला दिलंय.

^