Menu

दुसऱ्या महायुद्धात बॉम्ब टाकला; पण फुटला 2019 मध्ये

आतापर्यंत जागाने दोन महायुद्ध अनुभवली आहेत. 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं होतं. तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं. या महायुद्धाच्या जिवंत खुणा आजही युरोपमध्ये पहायला मिळतात. मंगळवारी अशीच एक घटना उघडकीस आली. दुसऱ्या महायुद्धात टाकण्यात आलेला बॉम्ब फुटला आणि त्यात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ac

पोलंडची राजधानी वर्झावाच्या नजीक असलेल्या कुरनिया रासिबोर्सका येथील जंगलात एक जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर पोलंडच्या लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू केलं. परंतु त्याच दरम्यान त्या बॉम्बच्या झालेल्या स्फोटात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रूग्णालायत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलंडचे संरक्षण मंत्री मारिऊस ब्लास्जजाक यांनी दिली. स्थानिक माध्यमांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तो बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीतील असल्याचं म्हटलं जात आहे.

ज्या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी यापूर्वी काही शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होतं. त्यानंतर ते एका ठिकाणी निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात अन्य राष्ट्राकडून टाकण्यात आलेले बॉम्ब युरोपियन देशांमध्ये सापडतात.

^