Menu

मुंबई : सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत – नवाब मलिक

 'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केलं होतं. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही,असा विचार नसल्याचेही ते म्हणाले. या संकटाच्या काळात पवार साहेबांनी धुरा हातात घेतली पाहिजे त्यांच्या अनुभवाने काही बदल होईल अस काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. काँग्रेसचे नेते असं बोलत असले तरी असं काही होणार नाही.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87-%e0%a4%af

^