Menu

मुंबई : एसबीआयने बचतीवरील व्याजदर घटवले; कोट्यवधी ग्राहकांना झटका

जर भारतीय स्टेट बँकेत तुमचं अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%8f%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%9a%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2

एसबीआय बँकेने बचत खात्यावरील व्याज दर कमी केले आहेत. हे नवीन व्याज दर १ नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत. एसबीआय बचत खात्यात १ लाख रूपये जमा ठेवणाऱ्या ग्राहकांना ३.५० टक्के व्यज दर देत आहे. पण १ नोव्हेंबरपासून हे व्यज दर ३.२५ टक्के होणार आहे.

त्याचप्रमाणे एसबीआयने रिटेल डिपॉजिटवर ०.१० टक्के आणि बल्क डिपॉजिटवर ०.३० टक्के दर घटवले आहेत. शिवाय, उद्यापासून एसबीआय होम-ऑटो आणि पर्सनल लोन स्वस्त करण्याच्या मार्गावर आहे.

एसबीआयने १० ऑक्टोबरपासून एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्के घट केली आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियाने ४ ऑक्टोबर रोजी ०.२५ टक्के व्याज दर घटवल्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे रेपो रेट ०.२५ टक्के घटवून ५.१५ टक्क्यांवर आलं आहे.

एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांनी घट केली आहे.

^