Menu

अर्जुन रामपाल २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम

मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्याने अखेर त्याच्या पत्नीसोबतच्या जवळपास २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. आपल्या खासगी जीवनाविषयी कायमच काही स्पष्ट भूमिका मांडत प्रकाशझोतात असणारा हा अभिनेता आहे, अर्जुन रामपाल.
%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a5%a8%e0%a5%a7-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a

‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (मंगळवार) १९ नोव्हेंबर २०१९ला या दोघांचा अधिकृतणे घटस्फोट झाल्याचा निर्णय दिला. परिणामी मेहेर जेसिया हिच्यासोबतचं त्याचं २१ वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं. परस्पर सामंजस्यातून हा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे. १९९८ मध्ये अर्जुन आणि मेहेर यांनी लग्न केलं होतं. या नात्यातून त्यांना दोन मुली आहेत. माहिका आणि मायरा अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींची जबाबदारी त्यांच्या आईकडे म्हणजेच मेहेरकडे राहील अशीही माहिती सूत्रांनी दिली.

^