Menu

स्टिव्ह स्मिथचा चमकला, ७३ वर्ष जुना विक्रमही मोडला

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात अ‍ॅडलेडच्या मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, यजमान ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर उभा केला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या द्विशतकी खेळीसोबत स्टिव्ह स्मिथनेही दुसऱ्या दिवसाच्या खेळात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम आता स्मिथच्या नावे जमा झाला आहे. दुसऱ्या दिवशी चहापानाच्या सत्रापर्यंत स्मिथ ३४ धावांवर खेळत होता.
%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a5%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%ad%e0%a5%a9

स्टिव्ह स्मिथने ७० कसोटी सामन्यात १२६ डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली. याआधी १९४६ साली इंग्लंडच्या वेली हॅमाँड यांनी १३१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

कसोटीत सर्वात कमी डावांमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज –

स्टिव्ह स्मिथ – १२६
वेली हॅमाँड – १३१
विरेंद्र सेहवाग – १३४
सचिन तेंडुलकर – १३६
विराट कोहली – १३८
गॅरी सोबर्स – १३८
कुमार संगकारा – १३८
या खेळीदरम्यान स्टिव्ह स्मिथने रिकी पाँटींगलाही मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून ७ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा स्मिथ सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून ७ हजार धावांचा टप्पा गाठणारे तरुण फलंदाज –

स्टिव्ह स्मिथ – ३० वर्ष १८० दिवस
रिकी पाँटींग – ३० वर्ष २१५ दिवस
मायकल क्लार्क – ३१ वर्ष ३२६ दिवस
अ‍ॅलन बॉर्डर – ३२ वर्ष १३९ दिवस
स्टिव्ह वॉ – ३३ वर्ष २०९ दिवस
मार्क टेलर – ३३ वर्ष ३५४ दिवस
डेव्हिड बून – ३४ वर्ष १०० दिवस
पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धुलाई केली. चहापानाच्या सत्रापर्यंत शाहीन आफ्रिदीचा अपवाद वगळता, एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही.

^