Menu

साऊथच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीचा भाजपात प्रवेश

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नमिता यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नमिता यांच्यासह अभिनेते राधा रवी यांनीही भाजपात प्रवेश केला. जे.पी नड्डा शनिवारी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. यावेळी नमिता आणि राधा रवी यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी गेली होती.
%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4

अभिनेत्री नमिता यांनी बिल्ला, इंग्लिश करन, जगन मोहिनी यासारख्या चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत. नमिता यांनी २००१ मध्ये मिस सुरतचे जेतेपद जिंकले तर मिस इंडियाची उपविजेती राहिल्या. नमिता यांचे दक्षिण भारतात मोठा  चाहतावर्ग आहे. कोयंमतूरमध्ये एका चाहत्याने नमिताचे मंदिर उभारले होते. ग्लॅमरस आणि बोल्ड अंदामुळे नमिता यांचा मोठा चाहतावर्ग असून लोकांमध्ये त्या चर्चेत असतात.

^