Menu

मुंबई : पंकजा मुंडेंच्या नाराजीवर विनोद तावडेंची प्रतिक्रिया

 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून 'भाजप' हटवले आहे. तसेच फेसबुक पोस्ट लिहत आपल्या समर्थकांना भावनिक साथ दिली आहे. त्यामुळे परळीध्ये १२ डिसेंबरला राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. या पराभवाला भाजपतील अंतर्गत कलह कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत अनेक भाजप नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. पण आता भाजप नेत्यांकडून याबद्दल सारवासारव करण्यास सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे नाराज नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे नाराज नाहीत, त्या भाजपा सोडणार नाही असे भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचा दाव्यात काही तथ्य नाही असेही तावडे म्हणाले. आमचे कोणतेही नेते शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत कोणतही पद पंकजा मुंडे यांनी मागितले नसल्याचेही यावेळी तावडे म्हणाले.

परळी मतदार संघातून पराजय झाल्यानंतर पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या प्रश्नांवर थोडा विचार करण्यासाठी स्वतःला वेळ हवा आहे. याकरता आपण आठ ते दहा दिवस कुणाशीही संपर्क साधणार नाही, असं पंकजा मुंडे त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या.

^