Menu

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्याना हे मिळणार सरकारी बंगले

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळाचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील मंत्र्याना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले नव्हते. ते आता करण्यात आले आहे. तसेच राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सरकारी बंगला देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता 'वर्षा' हा बंगला सोडावा लागणार आहे. आता या बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार आहेत.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-4

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार राज्यात स्थापन झाले. गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे सरकारने बहुमत चाचणीही जिंकली. तसेच विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली. फडणवीस यांच्या नावाची  घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.

सत्ता स्थापन झाल्यावर अखेर आज सामान्य प्रशासन विभागाने या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले आहे. कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला सरकारी निवासस्थान म्हणून मिळाणार आणि तिथे आधी कोण राहणार याची उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपली आहे. मागील पाच वर्षांपासून ‘वर्षा’ बंगल्यावर राहणारे देवेंद्र फडणवीस यांना हा सरकारी बंगला आता सोडावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला देण्यात आला आहे. हा बंगला दक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे आहे.

^