Menu

मुंबई : ‘एटीएम’चे नियम बदलणार, RBI चा निर्णय

‘एटीएम’चे नियम बदलण्याबाबत  भारतीय रिझर्व्ह बँकेने आता पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तशी RBI कडून घोषणा करण्यात आली आहे. आरबीआयने  ‘एटीएम’बाबत काही मार्गदर्शक तत्त्व लागू करण्याचे आणि एक विशेष कार्ड लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी यासंदर्भात सूतोवाच केले आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%8f%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%8f%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%ae-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2

रिझर्व्ह बँकेने आजच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत काही मोठे निर्णय घेतलेत. यात शॉपिंगसाठी नवे कार्ड, सायबर हल्ला, एटीएमचा गैरवापर आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या उद्देशाने विविध बँकांचे एटीएम बद्दलचे नियम बदलणार आहेत.

दरम्यान, एटीएम सेवा पुरवठादारांसाठी नवी नियमावली ३१ डिसेंबरला लागू केली जाणार आहे. त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलणार आहेत, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अॅप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने नजर ठेवण्यात यावी तसेच  महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.

^