Menu

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये उद्योगांसाठी भूखंड शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाल्यानंतर आता स्थानिक प्रशासनाने येथील भूखंड शोधण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. हे भूखंड ताब्यात घेऊन लँड बँकमध्ये जमा करता येणार आहेत. जेणेकरून जम्मू-काश्मीरमध्ये मोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी या जमिनी वापरता येतील.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-2

जम्मू काश्मीरमधील राज्य औद्योगिक विकास महामंडाळाचे (SIDCO)कार्यकारी संचालक रविंदर कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आम्ही सध्या लँड बँक तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. जम्मू आणि काश्मीर या दोन्ही भागांमध्ये मिळून साधारण ६२४ एकर जमीन मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापैकी काही भूखंड निश्चित करण्यात आले असून उर्वरित जमिनीची पाहणी सुरु असल्याचे रविंदर कुमार यांनी सांगितले. तसेच ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात आणखी जमिनीची पाहणी करण्यात येईल, असेही रविंदर कुमार यांनी स्पष्ट केले.

^