Menu

मुंबई : ‘भाजपने नाराज नेत्यांची काळजी घ्यावी’

एकनाथ खडसे काँग्रेस पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af

यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने आमचे आमदार फुटण्याची काळजी करू नये. याऐवजी त्यांनी स्वत:च्या आमदारांची चिंता करावी. भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. जनतेला नाथाभाऊंची अवहेलना आवडलेली नाही. काँग्रेसने अद्याप खडसे यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र, एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे आमच्या पक्षाची ताकद वाढेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीसंदर्भातही भाष्य केले. पंकजा मुंडे नाराज असल्याचे दिसत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून आमचे पंकजा यांच्याशी संबंध आहेत. आम्हाला त्यांच्या नाराजीचे कारण ठाऊक नाही. मात्र, भाजपने त्यांची नाराजी कशी कमी करता येईल, याचा विचार करावा, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

^