Menu

मुंबई : भाजपमधील नाराजीबद्दल एकनाथ खडसेंच मत

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी आमचे जवळचे संबंध आहेत. ४०-४५ वर्ष अनुभव असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात असावा अशी त्यांची इच्छा आहे. पण अद्याप मी त्याबद्दल काही निर्णय घेतला नसल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%a6

मी नाराज आहे ही बातमी चुकीची आहे. माझी मनधरणी करण्यासाठी मुनगंटीवार आणि तावडे आले असे नाही. नव्याने आलेले सरकार आणि आपले सरकार का आले नाही ? यावर आमची चर्चा झाल्याचे खडसे म्हणाले. जळगावच्या सिंचन प्रकल्पासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचसाठी काल शरद पवार यांची भेट घेतली होती असे खडसे यांनी स्पष्ट केले. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

^