Menu

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर होण्याआधी भाजपची बैठक

राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर होण्याआधी भाजपच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता संसदीय दलाची ही बैठक होणार आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राज्यसभेत काय रणनीती असेल त्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राज्यसभेत अनेकांनी विरोध केला आहे. अशा परिस्थितीत सरकार विधेयक कसं सादर करणार त्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7-2

लोकसभेत बहुमतानं विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. जेडीयू, शिवसेना, बीजेडी, वायएसआर या पक्षांच्या पाठिंब्यामुळे लोकसभेत भाजपला विधेयक मंजूर करून घेता आलं. राज्यसभेतही विधेयक सहज संमत होईल अशी भाजपला खात्री आहे. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४० एवढी आहे. मात्र ५ जागा रिक्त असल्यामुळे बहुमताचा आकडा १२१ एवढा आहे. भाजपचे ८३ खासदार आहेत. त्यामुळे भाजपला अजून ३८ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

एआयडीएमकेचे ११, जेडीयूचे ६, शिरोमणी अकाली दलाचे ३, अपक्ष आणि इतर मिळून १३ असे ११६ खासदार भाजपच्या बाजूनं मतदान करतील असा विश्वास भाजपला आहे. त्याशिवाय बिजू जनता दलाचे ७, वायएसआर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाचे २ असे मिळून १२७ खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याची चिन्ह आहेत. यापैकी काही पक्षांनी मतदानात सहभाग घेतला नाही, तरी भाजपला फायदा होईल.

^