Menu

दिल्ली : निर्भयाच्या दोषींकरता ‘फाशी घर’ तयार, एका दोरखंडाची किंमत 10 हजार रुपये

 तिहार कारागृह नंबर तीनमध्ये निर्भयाच्या दोषींच्या फाशीची तयारी सुरू झाली आहे. 'फाशी घर' यासाठी तयार केलं जात असून त्याची साफसफाई सुरू केली आहे. तिहार कारागृह प्रशासन राष्ट्रपतींकडे दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळली जाण्याची वाट पाहत आहेत. तिहार कारागृहाचे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवल्यावर कारागृहात दोषींच्या फाशीची तयारी सुरू केली जाते.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%80

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेवर हल्ला करणारा आरोपी अफजल गुरूच्या फाशीनंतर तिहार कारागृह क्रमांक तीनमध्ये असलेले फाशी घर हे बंदच आहे. फाशी घर तेव्हाच खुले केले जाते जेव्हा एखादी व्यक्ती परवानगीने भेट द्यायला येते. निर्भया हत्याकांडाच्या आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. मात्र असे असले तरीही कारागृहात त्यांच्या फाशीची तयारी केली आहे. या तयारीमध्ये फाशी घर स्वच्छ करणे आणि फाशीकरता दोरखंड मागवणे यासारखी तयारी केली जाते.

सुत्रांकंडून मिळालेल्या माहितीनुसार पाच दिवसांपूर्वीच लोक निर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाशी घरची तपासणी करून गेले आहेत. त्यांच्या तपासणीत, काही ठिकाणी तोडफोड झाली आहे तसेच साफसफाईची गरज देखील आहे.

^