Menu

अपशकुनी म्हणून हिणवल्या गेलेल्या अभिनेत्री विद्या बालनचा आज वाढदिवस

काही अभिनेत्री या त्यांच्या बहुविध भूमिकांसोबतच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. फक्त बोल्ड अदाच नव्हे तर, अभिनयाचीही बाजू भक्कम असणाऱ्या अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे विद्या बालन हिचं. घाबरवणारी 'माँजुलिका' असो किंवा मग रेडिओच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू करणारी 'सुलू' असो. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेत विद्याने जीव ओतला. अशा या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. या खास दिवसाच्या निमित्ताने तिच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. एका दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेल्या विद्या बालन हिने सातवी इयत्तेत असताना अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला 'एक दो तीन' या गाण्यावर ठेका धरताना पाहिलं. तेव्हाच तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला जो कुणीही बदलू शकलं नाही. सध्या ती यशाच्या शिखरावर असली तरीही, इथवर पोहोचण्याचा तिचा प्रवास काही फारसा सोपा नव्हता. 'हम पाँच' या कार्यक्रमातून तिने या जगतात पाऊल टाकलं. पण, तिने साकारलेली 'राधिका माथूर' फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. दरम्यान विद्याला कामही मिळेनासं झालं. असं म्हटलं जातं की, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तर तिला अपशकुनी म्हणत विचित्र कारणावरुन हिणवण्यातही आलं होतं. हे सारं सुरु असतानाच विद्याच्या वाट्याला आला 'परिणिता' हा चित्रपट. ज्यामुळे गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली.
%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be

^