Menu

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या जंगलात वणवा, ५ कोटी प्राण्यांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये सुमारे ५ कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले आहे. गेल्यावर्षी ऍमेझॉन जंगलाला लागलेल्या भीषण आगीनंतर ऑस्ट्रेलियातील जंगलात ४ महिन्यांपासून आग धगधगत आहे. देशातील परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे. १३ जानेवारीपासून ते ४ दिवस भारत दोऱ्यावर येणार होते. पुढील काही महिन्यांमध्ये पुन्हा भारत दौऱ्याची तारीख निश्चित करू असे सांगत स्कॉट मॉरिसन म्हणाले की, 'सध्या देशात आगीचा वणवा भडकला आहे. त्यामुळे आमचं संपूर्ण लक्ष देशातील जनतेच्या सुरक्षेकडे आहे. काहींची आगीतून सुखरूप सुटका करण्यात आली तर काही आजूनही आगीशी झुंज देत आहेत.' सध्या ऑस्ट्रेलियात भीतीचे वातावरण आहे.
%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a1%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%91%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c

^