Menu

JNU मध्ये जाणाऱ्या दीपिकाला केंद्र सरकारचा दणका

'छपाक' सिनेमात मालतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाणाऱ्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. सरकारकडून दीपिकाचे Skill India Promo संबंधित असलेले सर्व व्हिडिओ थांबवण्यात आले आहेत. सरकारविरोधी पाऊल उचलल्यामुळे दीपिकासोबत असं घडलं का? असा सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे. सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय Skill Development Ministry कडून दीपिकाचे प्रमोशनल व्हिडिओ काढण्यात आले आहेत. या व्हिडिओत दीपिका ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांबद्दल आणि कौशल्य विकासाबद्दल माहिती देणार होती. या व्हिडिओत काही ऍसिड पीडित तरूणींचा देखील समावेश होता.   कौशल्य विकासाचा हा व्हिडिओ दीपिकाच्या हस्ते बुधवारी प्रदर्शित करण्यात येणार होता. श्रम शक्ती भवनामार्फत हा व्हिडिओ दाखवण्यात येणार होता. मात्र मंगळवारी दीपिकाचा हा व्हिडिओ थांबवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
jnu-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be

^