Menu

श्रीलंकेविरुद्ध भारताला सीरिज जिंकण्याची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी टी-२० मॅच आज पुण्यात खेळवण्यात येणार आहे. गुवाहाटीची पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा विजय झाला. आता तिसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारताला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुण्याच्या स्टेडियममध्ये ४ वर्षांपूर्वीही टी-२० मॅच झाली होती. या मॅचमध्ये श्रीलंकेने भारताला १०१ रनवर ऑलआऊट केलं होतं. श्रीलंकेने ही मॅच ५ विकेटने जिंकली होती. दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताला अगदी सोपा विजय मिळाला. भारतीय बॉलरनी श्रीलंकेच्या बॅट्समनना मोठा स्कोअर करुन दिला नाही. तसंच भारताच्या सगळ्याच बॅट्समननी रनही केल्या. शार्दुल ठाकूरला सर्वाधिक ३ विकेट मिळाल्या तर नवदीप सैनीला २ आणि जसप्रीत बुमराहला १ विकेट मिळाली. ४ ओव्हरमध्ये १८ रन देऊन २ विकेट घेणाऱ्या नवदीप सैनीला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be

^