Menu

‘छपाक’ला मागे टाकत पुढे गेला ‘तान्हाजी’

10 जानेवारी 2020 मध्ये बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर खूप मोठी टक्कर पाहायला मिळाली. अजय देवगनचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमाची दीपिकाच्या 'छपाक' सिनेमातसोबत चांगलीच टक्कर झाली. हे दोन्ही सिनेमे अनेक दिवसांपासून चर्चेत होते. तगडी स्टार कास्ट आणि उत्तम कथानक ही या दोन्ही सिनेमांची बलस्थानं. यामुळे प्रदर्शनानंतर कोणत्या सिनेमाला रसिक मायबापाचं प्रेम सर्वाधिक मिळालं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या सिनेमाने पहिल्याच दिवशी लक्षवेधी कमाई केली आहे. आकड्यांमध्ये बोलायचं झाल तर सिनेमाने पहिल्या दिवशी 16 करोड रुपयांची कमाई केली. एवढंच नव्हे तर या सिनेमांना थोडं राजकीय वलय देखील निर्माण झालं होतं. याचा फायदा आणि फटका दोघांनाही झाला आहे. अजय देवगनच्या समर्थनाकरता भाजपचे अनेक नेते मैदानात उतरले होते. यामध्ये तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे.
%e0%a4%9b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%87-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a2%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2

^