Menu

दुबईत पावसाचा हाहाकार, सौदी अरबमध्ये बर्फवृष्टी

दुबईत पावसाने कहर माजला. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरही रनवेवर पाणी साचले आहे. त्यामुळे विमानांने उड्डाण घेताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. एअर इंडियाची चार उड्डाणे रद्द करावी लागल्याची माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली.  गुरुवारी आणि शुक्रवारी गडगडाट जोरदार पाऊस झाला. तसेच शनिवारीही विजांसह  गारांचा पाऊस पडला.  जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने दुबईत एकच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे दुबईत पावसाने कहर माजवला. पुरस्थिती निर्माण झाली आहे. तर तिकडे सौदी अरबमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. जगातल्या सर्वाधिंक थंडी असणाऱ्या भागांमध्ये तर हाडे गोठवणारी थंडी आहेच, पण सौदीसारख्या उष्ण आणि ओसाड भागांमध्येही बर्फवृष्टी सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. शुक्रवारी जॉर्डनच्या सीमेजवळील सौदी अरेबियाच्या काही भागात शुक्रवारी बर्फ पडले. तर इजिप्तमधील अलेक्झांड्रियासारख्या प्रदेशातील इतर भागात, लेबनॉन आणि सिरिया येथे बर्फाचे वादळ झाले. तसेच गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%8c

^