Menu

नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील दोषींच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी

निर्भयाच्या आरोपींची क्युरेटिव्ह याचिका आज सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. निर्भया प्रकरणात चार आरोपींपैकी दोन आरोपींनी याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी मोकळ्या न्यायलयात न होता न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये होणार आहे. ही सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे. न्या. रमन्ना, न्या. अरुण मिश्रा, न्या. नरीमन, न्या. भानुमती आणि न्या. अशोक भूषण यांचं पीठ क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी करणार आहे. एखाद्या दोषीची राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेली द्या याचिका आणि सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली तर दोषी व्यक्ती क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करू शकतात.न्यायमूर्ती भानुमती आणि न्यायमूर्ती भूषण यंच्या बेंचने आरोपींची पुनर्विचार याचिका 18 डिसेंबर रोजी फेटाळली होती. ज्यानंतर पटियाला हाऊसच्या ट्रायल कोर्टाने चारही आरोपींना 22 जानेवारी रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे वॉरंट निर्भयाच्या आईच्या तक्रारीवर दाखल केलं होतं.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-2

^