Menu

कोल्हापूर : वीर सावकारांच्या समलिंगी मुद्यावर राऊतांची बोलती बंद का?- चंद्रकांत पाटील

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन भाजपचे नाही आणि तो भाजपा पदाधिकारी नाही. त्या पुस्तकावरून संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या बाबत प्रतिक्रिया देत आहेत. मग सावरकर यांच्या बद्दल जेव्हा समलिंगी आणि नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे शारारिक संबंध होते अशा मुद्दे मांडले जात होते, त्यावेळी मग संजय राऊत यांची बोलती बंद झाली होती का ? असा पलटवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या मेळाव्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अनैसर्गिक आणि अनैतिक आघाडी राज्यात सत्तेत आहे. चोरून आणि लूटमार करून सत्ता मिळवली आहे. स्वर्गात दोन बोट गेली अस चित्र आहे. आम्हाला धमकी देऊ नका, गाडीचा टायर बदलायच्या अगोदर राज्यातील सरकार बदलेल, असं सांगून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री बंटी पाटील यांनी तोंड संभाळून टीका करावी.
%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a

^