Menu

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारकडून ‘तान्हाजी’ चित्रपट टॅक्स फ्री

उत्तर प्रदेश सरकारने ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला टॅक्स फ्री केलं आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफअली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. तान्हाजी चित्रपटाला टॅक्स फ्री केलं जावं अशी मागणी फार आधीपासूनच सुरु होती. उत्तर प्रदेशात ही मागणी मान्य करण्यात आली असून चित्रपट टॅक्स फ्री केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री केला जावा अशी मागणी होत आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तान्हाजी यांचं शौर्य आणि त्यागापासून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणने चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती केली होती. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.अजय देवगणने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “उत्तर प्रदेशात चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल योगी आदित्यनाथजी तुमचे आभार. हा चित्रपट तुम्ही पाहिलात तर मला अजून आनंद होईल”.
%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a4%a8%e0%a5%8c-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95

^