Menu

पुणे : उदयनराजे संतापले, म्हणाले बुद्धी गहाण ठेवली आहे काय?

 वाईट वाटते. बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? कोण तो गोयल? छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत. असा युग पुरुष एकदाच जन्माला येतो. उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची कोणीही करु शकत नाही. कोणाशीही महाराजांची तुलना होऊ शकत नाही. ३५० वर्षानंतरही त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्यानंतर आपण नतमस्तक होतो. अशा व्यक्तीमत्वाशी कोणाचीही तुलनाच होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करण्यावरुन भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय, असा प्रश्न पडतो असे यावेळी उदयनराजे यांनी म्हटले. मी पुस्तक वाचलेले नाही. मात्र, जे पुस्तकाबद्दल ऐकायला येत आहे त्याबद्दल वाईट वाटले. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटले. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो, असे यावेळी उदयनराजे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. मी राजकारण करणार नाही. शिवाजी महाराज जगातील आदर्श पण त्यांची तुलना केली जाते त्याच वाईट वाटतं. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का असा प्रश्न पडतो. या जगात महाराजांच्या उंचीचा कोणीच नाही, शिवाजी महाराज युगपुरुष होते. जाणता राजा ही उपमा कुणालातरी दिली जाते, त्याचाही मी निषेध करतो. कुठल्याच देशात त्या त्या देशातील योद्ध्यांची प्रतिमा धार्मिक स्थळी ठेवत नाहीत, मात्र शिवाजी महाराजांची ठेवली जाते हे त्यांचं मोठेपण. तुलना होऊच शकत नाही, पण आपण त्यांचं अनुकरण करू शकतो, त्यांच्यासारख होण्याचा प्रयत्न करू शकतो. लुडबुड करणाऱ्याचे मी नाव घेणार नाही. त्या घराण्यात माझा जन्म झाला. याचा मला अभिमान आहे, ते मी माझे सौभाग्य समजतो. मी वंशज म्हणून नावाचा दुरुपयोग केला नाही, मिरवलो नाही, असे उदयनराजे म्हणालेत.
%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a5%8d

^