Menu

पुणे : शिवसेनेने नाव बदलून ‘ठाकरेसेना’ करावे – उदयनराजे भोसले

शिवसेना नाव दिले तेव्हा वंशजांना विचारले होते का, असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारला. महाशिवआघाडी असे नाव दिले तेव्हाही विचारले होते का? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे विसर पडणे हीच यांची लायकी अशा शब्दांत उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका केली. आता तुम्ही शिवसेनेचे नाव बदला आणि ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला. 'शिव'वडा असं नाव ठेवता तेव्हा आदर कुठे जातो. वडापावला महाराजांचं नाव कसं काय दिलं जाऊ शकतं, अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. शिवाजी महाराजांवरुन काहीही झालं तरी तुम्ही वंशजांना विचारा म्हणता. तुमच्या पक्षाला शिवसेना हे नाव दिलं तेव्हा त्यांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा परखड सवाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज  उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.
%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a5%82%e0%a4%a8

^