Menu

मुंबई : कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. 'Shut Up Ya Kunal' या आपल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी कुणाल कामरा कृष्णकुंजवर आल्याचे समजते. कुणालने ट्विटरवर फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली. सध्या सोशल मीडियावर कुणाल कामराचा कृष्णकुंज निवासस्थानाबाहेरील फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये कुणाल कामराच्या हातात एक पत्र दिसत आहे. या पत्रात लिहले आहे की, मी तुमच्याबद्दल माहिती शोधली. तेव्हा तुम्हाला किर्ती कॉलेजचा वडापाव असतो, हे मला समजले. त्यामुळे मी तुम्हाला लाच द्यायला वडापाव आणला आहे. जेणेकरून तुम्ही माझ्या 'शटअप यार कुणाल' या कार्यक्रमासाठी याल, असे कुणाल कामराने या पत्रात म्हटले आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95

^