Menu

नाशिक : कोरोना व्हायरसचा आता कांद्यालाही फटका

चीनच्या करून व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशत आहे तेथील पर्यटनात कोणीच जायला तयार नाही की तिथल्या लोकांना आपल्या देशात येऊ देण्यास अनेकांनी निर्बंध घातले आहेत आता याचा फटका चीनच्या कांद्यालाही बसला आहे. कोरोनाचा आता कांद्यालाही झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत चीनचा कांदा कुणी घेत नसल्याचं चित्र समोर येत आहे.
%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86

जागतिक बाजारपेठेत कांदा निर्यातीसाठी भारताचे प्रतिस्पर्धी आहेत नेदरलँड आणि चीन. गेल्या वर्षी भारतात कांदा कमी असल्यानं चीननं निर्यातीत भारताला मागे टाकलं होतं. आता मात्र चीनचा कांदाही कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. कुठलाच देश चीनचा कांदा घ्यायला तयार नाही. अशा वेळी भारताचा कांद्याला जागतिक बाजारपेठेत चांगला फायदा होईल. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी तातडीनं उठवण्याची मागणी होत आहे. कांदा निर्यातबंदी लवकर उठली तर परकीय चलनही बक्कळ मिळेल आणि शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील. गरज आहे ती तातडीनं निर्णय घेण्याची. या निर्णयाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.

^