Menu

कोरोना व्हायरसचा बॉलिवूडला फटका

 कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. प्रत्येकजण या व्हायरसपासून स्वतःला रोखण्यासाठी सतर्क असून काही ना काही उपाय योजना करत असतात. केरळमध्ये देखील याची जागृकता दिसत आहे. यामुळे केरळ हे राज्य आपत्ती राज्य म्हणून घोषित केलं आहे. याचा फटका बॉलिवूडला होत आहे.
%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%82%e0%a4%a1

रोनी स्क्रूवाला यांच्या ‘सितारा’ सिनेमाचं शुटिंग रद्द करण्यात आलं आहे. या सिनेमाचं शुटिंग 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार होतं. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे हे शुटिंग रद्द करण्यात आलं आहे. याची माहिती दिग्दर्शक वंदना कटारिया म्हणतात की, ‘आमच्यासाठी टीमचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे. आमची टीम केरळमध्ये 30 जानेवारी रोजी पोहोचली होती. जवळपास 5 दिवस सगळी परिस्थिती पाहून टीमला पुन्हा बोलवण्यात आलं. पुढे थोडा विचार करून आणखी काय करता येईल याचा विचार करूया.’ या सिनेमात शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत होती. हा पहिला सिनेमा नाही ज्याची शुटिंग कोरोना व्हायरसमुळे रद्द झाली आहे. फक्त केरळमध्येच नाही तर इतर देशातही कोरोनामुळे सिनेमांच शुटिंग रद्द करण्यात आल्या आहेत. नागार्जून आणि सैयामी खेर यांचा ‘वाइल्ड डॉग’ या सिनेमाचं थायलंडमधील शुटिंग रद्द करण्यात आलं.

^