Menu

धक्काबुक्की प्रकरणी पाच खेळाडूंना आयसीसीचा दणका

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या U19 World Cup final आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिमत फेरीमध्ये बांगलादेशने जेतेपद पटकावलं. या सामन्यात भारताला नमवल्यानंतर अखेरच्या क्षणी जी परिस्थिती ओढावली ते पाहता क्रिकेट विश्व आणि क्रीडारसिकांच्या वर्तुळातून खंत व्यक्त केली गेली. बांगलादेशच्या खेळाडूंचं गैरवर्तन आणि त्यावर भारतीय खेळाडूंकडून आलेली प्रतिक्रिया या सर्व धक्काबुक्कीच्या प्रकरणामध्ये आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीला हस्तक्षेप करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेतील Potchefstroom येथे पार पडलेल्या या सामन्याच्या शेवटी झालेला हा सर्व प्रकार पाहता आयसीसीकडून एकूण पाच खेळाडूंना दोषी ठरवण्यात आलं आहे. आयसीसीने आखलेला शिष्टाचार मोडल्याप्ररपणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
%e0%a4%a7%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a

^