Menu

माऊंट मांगनुई : न्यूझीलंडकडून टी-२० पराभवाचा बदला, वनडेमध्ये भारत ‘व्हाईट वॉश’

टी-२० सीरिजमध्ये ५-०ने झालेल्या व्हाईट वॉश पराभवाचा बदला न्यूझीलंडच्या टीमने वनडे सीरिजमध्ये घेतला आहे. किवींनी भारताला वनडे सीरिजमध्ये ३-०ने व्हाईट वॉश केलं आहे. तिसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडकडचा ५ विकेटने विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या २९६ रनच्या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने ४७.१ ओव्हरमध्ये ३००/५ करुन केला.
%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%82%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9d%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%82%e0%a4%a1

न्यूझीलंडच्या कॉलीन डि ग्रॅण्डहोमने २८ बॉलमध्ये नाबाद ५८ रनची वादळी खेळी केली. यामध्ये ६ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. तर टॉम लेथम ३४ बॉ़लमध्ये ३२ रनवर नाबाद राहिला. भारताने २९६ रनचं लक्ष्य दिल्यानंतर बॅटिंगला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. मार्टिन गप्टील आणि हेन्री निकोल्सने न्यूझीलंडला १६ ओव्हरमध्ये १०६ रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. मार्टिन गप्टील ६६ रनवर माघारी परतला, तर हेन्री निकोल्सने सर्वाधिक ८० रन केले. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या कर्णधार केन विलियमसनला २२ रन करता आले. तर फॉर्ममध्ये असलेला रॉस टेलर १२ रन करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. शार्दुल ठाकूरने ९.१ ओव्हरमध्ये तब्बल ८७ रन दिले. नवदीप सैनीच्या ८ ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या बॅट्समननी ६८ रन काढल्या. भारताचे इतर बॉलर किफायतशीर राहिले. न्यूझीलंडने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. ओपनर मयंक अग्रवाल १ रन करुन आऊट झाला. तर कर्णधार विराट कोहलीलाही मोठी खेळी करता आली नाही. ९ रन करुन विराटला परतावं लागलं. पण केएल राहुलने पहिले श्रेयस अय्यर आणि मग मनिष पांडे यांच्यासोबत शतकी पार्टनरशीप केल्या. केएल राहुलने ११२ रन केले. तर श्रेयस अय्यरला ६२ आणि मनिष पांडेला ४२ रन करता आले.

वनडे सीरिजनंतर आता भारत आणि न्यूझीलंडमध्ये २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम न्यूझीलंड-११ विरुद्ध ३ दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. २१ फेब्रुवारीपासून पहिली तर २९ फेब्रुवारीपासून दुसरी टेस्ट मॅच सुरु होईल.

^