Menu

जालना : नाफेडकडून तूर खरेदी सुरु; व्यापाऱ्यांना चाप, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण

नाफेडने यावर्षी देखील तूर खरेदी सुरु केली आहे. यंदा नाफेडकडून तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव दिल्या जातोय. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. नाफेडने तूर खरेदी सुरु करण्याआधी व्यापाऱ्यांनी मनमानी भावाने तूर खरेदी सुरु केली होती. त्यामुळे नाफेडच्या तूर खरेदीमुळे व्यापाऱ्यांना आता चांगलाच चाप बसलाय.
%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%a6

८ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातलं नाफेडचं पहिलं तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने व्यापाऱ्यांना चांगलाच चाप बसलाय. नाफेडचं हे खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावर्षी नाफेडने तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केल्याने व्यापाऱ्यांचा बुरखा फाटलाय. हे केंद्र सुरु होण्याआधी शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांनी ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये एवढ्या कमी दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता व्यापाऱ्यांकडे पाठ दाखवत नाफेडकडे तूर विक्रीसाठी गर्दी केलीय.

^