Menu

मुंबई : अतिवृष्टी व पूरबाधितांचे ५२५ कोटींचे पीक कर्ज माफ

गतवर्षीच्या जुलै-ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित जिल्ह्यांतील शेतक-यांचे 525 कोटींचे पीक कर्ज माफ करण्यासंबंधीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांसह अन्य काही जिल्ह्यांत गेल्यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या जिल्ह्यांत प्रचंड पूर आला. लाखो लोकांचे नुकसान झाले. उभी पिके पाण्यात सडली शेतीतील माती वाहून गेल्याने जमिनीचा पोतही बिघडला आहे. सुमारे आठवडाभर या जिल्ह्यात पुराने थैमान घातले होते.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a7

या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या भागातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी सहकार विभागासमवेत घेतलेल्या बैठकीत घेतला होता. आज यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला. यानुसार एकूण 525 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. त्यापैकी सर्वाधिक पीक कर्ज 295 कोटी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. सांगली जिल्ह्यात 105 कोटींचे कर्ज आहे. या 525 कोटींपैकी 300 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार असून, बाकीची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाणार असल्याचे सहकारमंत्र्यांनी सांगितले.

^