Menu

श्रीनगर : पुन्हा पुलवामा हल्ल्याचा कट; ‘गझनवी फोर्स’ सक्रिय

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पुलवामाप्रमाणेच आणखी एका मोठ्या हल्ल्याचा कट रचला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून आयईडीमार्फत मोठ्या हल्ल्याचा कट असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे.
%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b9

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेतृत्त्वात आयएसआय या पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणेतील दहशतवाद्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा कट रचला आहे. या गटाला संयुक्तरित्या ‘गझनवी फोर्स’ असं नावही देण्यात आलं आहे. ज्यामध्ये जैश-ए- मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि अद बद्रच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. पुढील काही दिवसांमध्ये या गटाकडून आयईचीचा वापर करत सुरक्षा दलांच्या ताफ्यावर पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट असल्याचं सांगण्यात येत आहे. याच माहितीच्या आधारे सर्व सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

^