Menu

मुंबई : मुंबईचे डबेवाल्यांना हक्काची घरे मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश

महाराष्ट्र विकासआघाडी सरकारने मुंबईचे डबेवाले यांना चांगली बातमी दिली आहे. मुंबईतील डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध देण्याची तातडीने कार्यवाही करावी, तसे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी पवार यांनी दिलेत.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be

मुंबई डबेवाले यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या भवनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिलेत. यावेळी मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

^