Menu

अशी झाली ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरूवात

आज 'व्हॅलेंटाईन डे'.. जगभरात हा प्रेमाचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तर नववर्षी प्रत्येक प्रेमी युगुल १४ फेब्रुवारीची वाट पाहातं असतो. त्याचप्रमाणे आपल्या साथीदारासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रत्येकाची तयारी असते. प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असतं तसचं आज प्रेमी युगुलांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. तर हा दिवस नक्की कधीपासून साजरा करण्यात आला. या मागचं इतिहास काय आहे. हे जाणून घेणं देखील तितकचं गरजेचं आहे.
%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%9a

रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरूवात झाली होती. रोमच्या केलेडियस राजाला प्रेम करणाऱ्यांचा अत्यंत राग होता. प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास असं त्याचं मत होतं. त्यामुळे त्याने रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यास बंदी घातली होती. पण संत व्हेलेंटाईनने राजाच्या आदेशाचा विरोध करून अनेक सैनिकांचा प्रेम विवाह लावून दिला. जेव्हा व्हेलेंटाईनने राजाच्या आदेशाचा विरोध केला. तेव्हा केलेडियसने व्हेलेंटाईनला तुरूंगात टाकले. तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती. फाशीच्या आदल्या दिवशी व्हेलेंटाईनने आपल्या भावना पत्राच्या माध्यमातून प्रकट केल्या. या पत्राचा शेवट त्याने ‘युअर व्हेलेंटाईन’ असा केसा होता. तेव्हापासून १४ फेब्रुवारी हा दिवस व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो. अशी अख्यायिका आहे.

^