Menu

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची घोडदौड कौतुकास्पद असून कॉलेजच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम केले जात आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये या संस्थेने केलेले कार्य संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असल्याचे सांगून नव्याने सुरु केलेले सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मितीचे कार्य सिध्दार्थ भोकरे यांनी जोमाने करावे व सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा उद्देश सार्थक व्हावा असा संदेशही त्यांनी दिला. सिध्दार्थ भोकरे फिल्म या निर्मिती कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. संजय भोकरे कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, संजय भोकरे, पराग इनामदार आदिजण उपस्थित होते.
%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%ad%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%a8%e0%a4%bf

^