Menu

मुंबई : भीमाकोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबड़े यांना दिलासा नाही

शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबड़े यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. मात्र या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांच्या विनंतीनुसार त्यांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा दिला आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या समोर सुनावणी झाल्या नंतर राखून ठेवलेला निर्णय आज दिला.  भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप गौतम नवलाखा यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

^