Menu

देवगड : आमदार नितेश राणेंकडून ‘सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल’ची घोषणा

सर्वाधिक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, सामाजिक दिशा देणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजदत्त तसेच सिनेसृष्टीत स्वत:च्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना ‘एसएनएफएफ जीवनगौरव २०२०’ देऊन सन्मानित केले जाईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. देवगड येथील कंटेनर थिएटरमध्ये यावर्षी पुन्हा एकदा ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल २०२०’ (SNFF) चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेते अनिल गवस, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री स्नेहल शिदम, महोत्सव दिग्दर्शक सुमित पाटील, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे आदी मान्यवर उपस्थित होते.
%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%95

^