Menu

नाशिक : ‘कांदा निर्यातीसाठी केंद्राकडून प्रतिसाद नाही, शेतकरी अडचणीत’

कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत असल्याने कांद्याची निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांसह लासलगाव बाजार समिती प्रशासनाकडून केंद्रसरकारकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जात आहे. मात्र केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यात खुली करण्यासाठी कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसत आहे. फार काळ लांबलेला पाऊस आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाची आवक घटली आणि बाजार भाव गगनाला भिडल्याने निर्यातबंदी करण्यात आली होता. मात्र आता पुरवठा सुरळीत असल्याने निर्यात खुली करण्याबाबत मागणी केली जात आहे.
%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0

गेल्या पाच काही वर्षांपासून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. याचा फटका शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे कांदा निर्यात होत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक नेहमीच अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता कांद्याबाबत दीर्घकालीन धोरण अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

^