Menu

मुंबई : पवार काय बोलतात हे फक्त उद्धव ठाकरेंनाच कळतं – चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे हे शरद पवार सोडून इतर कोणाचंही ऐकत नाहीत. एरवी शरद पवार काय बोलतात हे कोणालाच कळत नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना ते बरोबर समजते, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनानिमित्त आझाद मैदानावर आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%ab

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे अजूनही चाचपडत आहेत. त्यांना गुंठा आणि हेक्टरमधील फरक कळत नाही. त्यांना फक्त मुंबईतील जमिनींचे भाव माहिती आहेत. त्यामुळे देवेंद्रजी तुम्ही तरी उद्धव ठाकरेंना समजावून सांगा, अशी खोचक टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे कोणाचेही म्हणणे ऐकून घेत नाहीत. आज मुख्यमंत्री विधानभवनातून पळून गेले. उद्धव ठाकरे फक्त शरद पवारांचं ऐकतात. शरद पवार काय बोलतात हे इतर कोणालाही कळत नाही. फक्त उद्धव ठाकरे यांनाच कळते, अशी टीका पाटील यांनी केली.

^