Menu

नवी दिल्ली : सोन्याच्या दरांनी गाठली सात वर्षांतील विक्रमी उंची

सोन्याच्या वाढत्या दरांचा वेग काही केल्या मंदावण्याचं नाव घेत नाही आहे. पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी कमालीची उसळी मारली आहे.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%b0-2

चीनमध्ये परसलेल्या कोरोना व्हायरसमुळे सराफा बाजारांवरही याचे परिणाम झाले आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी मागील सात वर्षांमध्ये सोन्याचे हेच दर आता गगनाला भिडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्याच्या व्यवहारांवर झालेले परिणाम पाहता भारतात त्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रांस शेअर बाजारामध्ये गुंतवणुकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. याचे थेट परिणाम भारतात दिसू लागले आहेत. मंगळवारच्या दिवशी ‘वायदा कारोबार’मध्ये सोन्याची किंमत ९२७ रुपयांनी वाढली. किंमतीत एकूण २.१७ टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहाला मिळालं. परिणामी, प्रति दहा ग्रॅम सोन्यासाठी ४३ हजार ५९३ रुपये मोजावे लागत आहेत.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार युरोपातही भारतीय बाजारांची अवस्था बेताचीच बाहायला मिळाली. फ्रँकफर्ट शेअर बाजारात ३.७ टक्के, लंडनमध्ये ३.५ टक्के, मद्रिदमध्ये ३.३ टक्के आणि पॅरिसमध्ये ३.८ टक्के इतक्या स्तरावर हे आकडे घसरले आहेत. लंडन सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर १,६८९.३१ डॉलरवर पोहोचला आहे. २०१३मध्ये सोन्याच्या दरांमध्ये अशी लक्षणीय वाढ पाहायला मिळाली होती.

^